'रोबोटिक नी रिप्लेसमेंट'वरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे पुण्यात आयोजन | Dr. Narendra Vaidya

  9552532038 / 9822020130    HELPLINE: 020 67286728      appointment@lokmanyahospitals.in

  9552532038 / 9822020130    HELPLINE: 020 67286728      appointment@lokmanyahospitals.in

  9552532038 / 9822020130

 HELPLINE: 020 67286728

Events and Update

‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’वरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे पुण्यात आयोजन

पुणे :  येथील ‘लोकमान्य हॉस्पिटल’तर्फे ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये ही परिषद होणार असून, यात अमेरिका, दुबई, इराण, ओमान, इराक, येमेन अशा अनेक देशातील अडीचशेपेक्षा अधिक अस्थिरोग तज्ञ भाग घेणार आहेत. यामध्ये केस स्टडीज, पेपर प्रेझेंटेशन्स, लाईव्ह सर्जरीज आणि जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाची पुढची वाटचाल आदी विषयांचा समावेश आहे.आताच्या काळाची गरज लक्षात घेता या परिषदेत ‘इंटरअॅक्टीव्ह टेक्नोलॉजी’ (संवादात्मक तंत्रज्ञान) ही संकल्पना घेऊन तज्ञ,‘पारंपरिक पध्दती ते रोबोटिक तंत्रज्ञान’ या प्रवासाचा आढावा  घेतील.
अमेरिकेबाहेर प्रथमच सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी ‘लोकमान्य हॉस्पिटल’ येथे देशातील पहिल्या ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ केंद्राची सुरूवात केली. आतापर्यंत त्यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दोन हजारहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले, ‘जॉईंट रिप्लेसमेंट क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान हे रूग्णांसाठी फायदेशीर ठरले आहे.त्यामध्ये ‘रोबोटिक आर्थोप्लास्टी’ हे एक अभिनव तंत्रज्ञान म्हणून समोर आले आहे. ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ ही गेल्या दशकातील सर्वांत यशस्वी शस्त्रक्रियांपैकी एक आहे, मात्र २५ ते ३० टक्के रूग्णांमध्ये याचा पुरेसा परिणाम अजून दिसून आलेला नाही. याचाच अर्थ या प्रक्रियेमध्ये अजून सुधारणांना वाव असून, अधिक अचूकता येणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियेमधील आधुनिकतेसंदर्भात आपण आज महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. आर्थोप्लास्टीमधील तंत्रज्ञान हे शल्यविशारदांसाठी कार्यक्षम व परिणामकारक साधन आहे, ज्यामुळे सातत्याने चांगले परिणाम दिसून येत आहेत.’
डॉ. वैद्य पुढे म्हणाले, ‘या परिषदेद्वारे इतर शहरातील शल्य विशारदांना रोबोटिक शस्त्रक्रियांबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळेल. सध्या अजूनही रूग्ण रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी युरोप व अमेरिका असा लांबचा पल्ला गाठतात. लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया किफायतशीर दरात निमशहरी व ग्रामीण भागातील रूग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. त्यामुळेच याबाबत अधिक प्रशिक्षण व मार्गदर्शनाची गरज आहे. अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगभरामध्ये संधिवात, गुडघेदुखी ही समस्या अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे २८.७ टक्के इतक्या प्रमाणात संधिवाताचे रूग्ण आढळतात. सद्यस्थितीतील बदलती जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव, आहारातील फास्ट फूडचे सेवन यामुळे ५० ते ६० वयोगटामध्ये या प्रकारच्या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसते.’